Ad will apear here
Next
डॉ. सौरभ दुबेंशी गप्पा
डॉ. सौरभ दुबेपुणे : मराठी विज्ञान परिषदेचा पुणे विभाग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक अँड एज्युकेशनल रिसर्च (आयसर)  आणि गरवारे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सायन्स गप्पा’ या कार्यक्रमात आयसर येथील शास्त्रज्ञ डॉ. सौरभ दुबे यांच्याशी संवाद साधण्याची संधी विज्ञानप्रेमींना उपलब्ध झाली आहे. आज, शुक्रवारी, नऊ जून रोजी सायंकाळी सव्वासहा वाजता कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात हा गप्पांचा कार्यक्रम रंगणार आहे. डॉ. दुबे ‘आपल्या विश्वाचे सर्वांत लहान तुकडे’ या विषयावर गप्पा मारणार आहेत. हा कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य खुला आहे. 

अधिकाधिक विद्यार्थी, नागरिक यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष यशवंत घारपुरे यांनी केले आहे.

कार्यक्रमाविषयी :
दिनांक : नऊ जून २०१७
वेळ : सायंकाळी ६.१५ वाजता
स्थळ : गरवारे महाविद्यालयाचे सभागृह, कर्वे रोड, पुणे

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZQCBD
Similar Posts
‘सूक्ष्म कणांच्या अभ्यासातून कळेल खगोलशास्त्राची व्याप्ती’ पुणे : ‘अणू आणि रेणू या लहान कणांचे विश्व व्यापक आहे. उच्च प्रतीच्या ऊर्जेच्या साह्याने आपण विश्वातील या लहानातील लहान कणांना पाहू शकतो. अवकाशातील विविध घटकांचा अभ्यास करण्यासाठी हे सूक्ष्म कण उपयुक्त ठरत आहेत. त्यामुळे येत्या काळात या सूक्ष्म कणांच्या अभ्यासातून खगोलशास्त्रातील माहितीची अनेक नवीन दालने
‘सायन्स गप्पा’ कार्यक्रमात ‘ओशियनोग्राफी’वर चर्चा मराठी विज्ञान परिषदेचा पुणे विभाग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक अँड एज्युकेशनल रिसर्च (आयसर) आणि गरवारे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘सायन्स गप्पा’ या कार्यक्रमात, विज्ञानप्रेमींना आयसर येथील शास्त्रज्ञ डॉ. रजनी पंचांग यांच्याशी संवाद साधता येणार आहे. ११ ऑगस्ट २०१७
‘ज्यू लोकांना समाजकल्याणाचा मोठा वारसा’ पुणे : ‘पुण्यातील ससून हॉस्पिटल, निवारा संस्था, मुंबईतील काळा घोडा, मशीद बंदर, कोकणातील अनेक प्रार्थनास्थळे पाहिल्यानंतर ज्यू समाजाच्या वास्तुरचनेचा वारसा आपल्या लक्षात येतो. एवढेच नव्हे, तर या आणि अशा सामाजिक कार्यात ज्यू लोकांनी दिलेले योगदान आणि मराठी भाषा-संस्कृतीशी असलेली नाळ पाहता त्यांचा समाजकल्याणाचा
‘सायन्स गप्पा’मध्ये डॉ. विनिता बाळ पुणे : मराठी विज्ञान परिषद व ‘आयसर’तर्फे ‘सायन्स गप्पा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विज्ञानप्रेमींना आयसर येथील शास्त्रज्ञ डॉ. विनिता बाळ यांच्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ‘जीवविज्ञान–एक बायकी दृष्टिकोन’ या विषयावर हा गप्पांचा कार्यक्रम रंगणार आहे.  पुण्यातील

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language